लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण!

सावधान: या लेखात व या लेखमालेतील पुढील लेखांत सांगीतलेली कोणतीही कृती करण्याआगोदर, आपल्या संगणकातील विदा (डेटा) चा सुरक्षीत बॅकअप घ्या.याशिवाय या लेखात सांगीतलेले काहीही करण्यास मनाई आहे. बॅकअप घेऊन किंवा न घेऊन ही जे काही कराल व त्यामुळे जे काही चांगले – वाईट  / फायदा – नुकसान / विंडोज उडणे / पार्टीशन करप्ट होणे ई. होईल त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असाल. कोणत्याही फायदा / नुकसानीस लेखक किंवा लिनक्स प्रणाली किंवा मुक्तस्त्रोत समुदाय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी!

त.टी. मी पुण्याचा नाही.

नमस्कार.
लिनक्स (Linux) वापरायची सुरुवात करताना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे, कोणते लिनक्स वापरावे? मागे एकदा वाचले होते त्याप्रमाणे लिनक्स मधे ३०० वेगवेगळ्या डिस्ट्रोज (distros) आहेत. (तेव्हा तरी होत्या.)
तरी, नव्या वापरकर्त्यांनी सुरुवात करताना युबुंटु (Ubuntu) किंवा मिंट (Mint) यांचे मुख्य (युनिटी Unity) किंवा केडीई (K.D.E.) हे व्हर्जन वापरावे. (आजच्या तारखेचे मत).
याचे मुख्य कारण तांत्रीक नसुन, युबुंटू मागे असलेला समुदाय व त्यायोगे मिळणारे सहाय्य हे आहे. तांत्रीक दृष्ट्या दिलेल्या कोणत्याही एकाच प्रतलातील सर्व लिनक्स या सारख्याच ताकदीच्या असतात.
तसेच युबुंटु व कुबुंटु साठी अधिकृत सशुल्क सपोर्टही मिळत असल्यामुळे ज्यांना असा पेड सपोर्ट हवा असतो त्यांचीही सोय होते. हा पेड सपोर्ट वयक्तीक व संस्था अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांना मिळतो.
यात, तुम्हाला युबुंटु चे मुख्य डी.ई. युनीटी जरी आवडले नाही, तरी निराश होऊ नका. आपल्याकडे इतर अनेक पर्याय आहेत. त्यातील एखादा किंवा एका पेक्षा जास्त तुम्ही वापरु शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या लेखांत येईलच.
Read more

लिनक्स क्विकस्टार्ट – १ – योग्य प्रश्न कसे विचारावे?

सामान्य माणसाला लिनक्स कसे वापरता येईल या विषयवार लेखमाला सुरु करत आहे. सर्व प्रकारच्या प्रश्नांचेस्वागत असेल. तरी खालील मार्गदर्शक तत्वे पाळल्यास सगळ्यांचाच अनुभव सुखद होईल.

  1. लिनक्स किंवा एकुणातच मुक्तस्त्रोताबद्दल सर्व प्रकारच्या प्रश्नांचे स्वागत असेल आणि त्यांची उत्तरे दिली जातील. पण त्याच वेळेला प्रश्न आणि वाक्य (आरोप) या दोघांमधे काय फरक आहे एवढे मराठी व्याकरणाचे ज्ञान प्रश्नकर्त्यास असावे अशी माफक अपेक्षा आहे.

  2. लिनक्स का वाईट आहे / ते का वापरु नये / तुम्हाला किंवा समाजाला त्याच्यापासुन कसे नुकसान झाले हे सगळे सांगण्यासाठी एक वेगळा धागा काढावा. तिथे हे सगळे एकत्रितपणे लिहावे. त्यामुळे भविष्यात कोणी समदु:खी आल्यास त्यालाही तिथेच लिहिण्याची सोय मिळेल.
    लिनक्स लेखमाला ही अशा व्यक्तींसाठी आहे जे संगणक तंत्रज्ञानाशी संबंधीत नाहीत आणि नेहमीपेक्षा चांगला सक्षम विकल्प म्हणुन लिनक्स वापरु पाहत आहेत. कृपया लेखमालेच्या धाग्यावर येऊन त्यांचे मनोधर्य खचेल किंवा आणखी गैरसमजच होतील असे काही लिहु नये. त्यासाठी वेगळा धागा काढण्याची विनंती करत आहे.

  3. सर्व प्रकारच्या सुचनांचे व सुधारणांचे स्वागत आहे.

  4. लेखमालेच्या त्या त्या भागांवर त्या त्या भागांसंबंधीच प्रश्न विचारल्यास, सर्व भागांचे प्रश्न एकाच धाग्यात राहुन भविष्यातील वाचकांचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

  5. ही लेखमाला माझ्या वर्तमान किंवा भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या आर्थीक फायद्यासाठी लिहिली जात नसुन, केवळ मला माहिती असलेले काही चांगले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणुन लिहिली जात आहे. कमी जास्त झाल्यास सांभाळुण घेणे.

  6. मराठी संकेतस्थळांव्यतिरिक्त, लिनक्स किंवा मुक्तस्त्रोतासंबंधी सर्व प्रकारचे प्रश्न“‌ मला थेट विचारण्यासाठी त्या त्या संस्थळावरील विचारपुस, व्यनी किंवा माझ्या वयक्तिक अनुदानीचा उपयोग कधीही करु शकता.

  7. माझ्या वर्तुळाबाहेर असे काही‌ लेख लिहिण्याची / माहीती सांगण्याची माझी ही सुरुवातच आहे. त्यामुळे मागच्या लेखात माझ्याकडुन काही कमीजास्त झाले असल्यास त्या बद्दल दिलगीर आहे. तरी यापुढे असे काही होऊ नये दोऩी बाजुंकडुन म्हणुन, खाली काही लिंक देत आहे त्या आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. मला काय घ्यायचे ते मी तिथुन घेतले आहे. आपणही थोडा वेळ देउन ते वाचावे ही विनंती:

लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र.

लिनक्स  व मुक्तस्त्रोत – गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र – वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.

आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरुवात करण्या आगोदर, मुळातच लिनक्स कुणासाठी बनवलेले (Target User Base) आहे हे बघु. जेव्हा आपण लिनक्सवर; ते वापरायला कठीण आहे, त्यात नेहमीचे सॉफ्टवेअर चालत नाहीत ई. अनेक आरोप करतो तेव्हा लिनक्स मुळातच आपल्यासारख्या वापरकर्त्यासाठी बनलेले आहे किंवा कसे हे तपासुन बघणे गरजेचे ठरते. अन्यथा आपण ज्या देशाचे नागरीक नाही किंवा ज्या भुभागाशी परंपरेने जोडलेले नाही, त्या विशिष्ट देशातले किंवा भुभातले पारंपारीक खाद्यपदार्थ कसे बनवायला कठीण आहेत, विचित्र आहेत, अपायकारकरित्या तिखट आहेत, मांसाहारासाठी वापरलेले साहित्य किळसवाणे आहे किंवा बेचव आहे असे म्हणुन त्याला नावे ठेवणे आणि लिनक्सवरील अनेक आरोप या दोन्हीत काहीच फरक नाही.

Read more

ड्वोरॅक आराखडा

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.

या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी‌ झाले. संगणक आल्यानंतर सर्वात प्रचलीत आराखडा म्हणून संगणकाच्या कळफलकावही तोच वापरला गेला आणि आजही हाच आराखडा सर्वात जास्त प्रचलीत आहे.

Read more

Hello world! / राम राम

Hello.
Welcome to my wordpress blog. I will be writing about technology, politics, social issues and other general topics.

I will try to rewrite few articles from my previous blog here as best as possible. That old blog was deleted accidentally. I lost some nice articles there.

Please leave your feedback.

राम राम पावनं. माझ्या वर्डप्रेस ब्लॉग वर आपले स्वागत आहे. मी तंत्रज्ञान, राजकारण, सामाजिक समस्या आणि इतर सामान्य विषया बद्दल लिहित जाईन. मी शक्य तितके माझ्या मागील ब्लॉग मधुन काही लेख पुनर्लिखित करण्याचा प्रयत्न करेल. तो जुना ब्लॉग चुकून हटवण्यात आला होता. त्यात मी काही छान लेख गमावले.

आपला अभिप्राय द्या.